पंढरपूर सिंहगडमध्ये “पीसीबी मॅन्युफॅक्चरिंग अँड ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन” विषयावर व्याख्यान*

 *पंढरपूर सिंहगडमध्ये “पीसीबी मॅन्युफॅक्चरिंग अँड ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन” विषयावर व्याख्यान*



पंढरपूर : प्रतिनिधी

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात बुधवार, दिनांक ११ मार्च २०२६ रोजी “पीसीबी मॅन्युफॅक्चरिंग अँड ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन : इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू अँड अप्लिकेशन्स” या विषयावर माजी विद्यार्थिनी अवंतिका भोसले यांचे व्याख्यान संपन्न झाले, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना पीसीबी मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील त्याचे महत्त्व तसेच ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन तंत्रज्ञान आणि आधुनिक संप्रेषण क्षेत्रातील त्याचे विविध उपयोग याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच विद्यार्थ्यांना पीसीबी डिझाईन, उत्पादन प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीत त्याची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनमुळे इंटरनेट, मोबाईल नेटवर्क आणि आधुनिक संप्रेषण व्यवस्था अधिक वेगवान व कार्यक्षम कशा झाल्या आहेत याची माहितीही देण्यात आली. या क्षेत्रातील वाढत्या औद्योगिक संधी, नवीन तंत्रज्ञान आणि आवश्यक तांत्रिक कौशल्यांबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी विद्यार्थिनी अवंतिका भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विभागातील प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सोनाली गोडसे, प्रा. स्वप्निल टाकळे, प्रा. वैभव गोडसे यांच्यासह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad