डॉ.विशाल शेवाळे यांचा नागेश फाटे यांच्या हस्ते सन्मान
पंढरपूर/प्रतिनिधी
डॉ.विशाल बाळासाहेब शेवाळे यांची डीएम हृदयरोगतज्ज्ञ या उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी केआयएमएस कराड येथील मेडिकल क्षेत्रातील नामांकित विद्यापीठात निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष उद्योग, व्यापार विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी डॉ.विशाल बाळासाहेब शेवाळे यांना आपल्या मेहनत, समर्पण आणि जिद्दीमुळे मिळालेलं हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या पुढील वैद्यकीय सेवेतून अनेक रुग्णांना नवजीवन मिळो ही अपेक्षा व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पळशीचे माजी सरपंच बाळासाहेब शेवाळे,डॉ. मोहन शेवाळे, हनुमंत शेवाळे ,निवास शेवाळे, मंगेश शेवाळे ,सर्जेराव मासाळ, अमोल यलमार, डॉ. रमेश फाटे, उमेश फाटे, शुभम फाटे, शशांक फाटे उपस्थित होते.

