*एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पंढरपूर येथे ‘स्मार्ट आयओटी (वस्तूंचे इंटरनेट) सिस्टिम्स यूजिंग आर्डुइनो’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*

 *एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पंढरपूर येथे ‘स्मार्ट आयओटी (वस्तूंचे इंटरनेट) सिस्टिम्स यूजिंग आर्डुइनो’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*




एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (कोर्टी, ता. पंढरपूर) येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामार्फत द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट आयओटी (वस्तूंचे इंटरनेट) सिस्टिम्स यूजिंग आर्डुइनो’ या विषयावर 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2026 या कालावधीत तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला सुमारे 70 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या कार्यशाळेस विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून एन. बी. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे प्रा. शशिकांत हिप्परगी उपस्थित होते. त्यांनी ‘आयओटी’ अर्थात “वस्तूंचे इंटरनेट” या संकल्पनेचे सखोल मार्गदर्शन करताना आयओटीची कार्यपद्धती, आयओटी व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा समन्वय, तसेच औद्योगिक क्षेत्रातील त्याचा वापर याविषयी माहिती दिली. प्रत्यक्ष हँड्स-ऑन सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना आयओटी प्रणाली विकसित करण्याचा अनुभव देण्यात आला.

तसेच एन. बी. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर येथील टेक्निकल असिस्टंट श्री. विवेक भरमशेट्टी यांनी प्रात्यक्षिकांदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक सहाय्य केले. आर्डुइनो आधारित सर्किट्स, हार्डवेअर कनेक्शन आणि प्रोग्रॅमींग संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी सेन्सर्स व अॅक्च्युएटर्सचा वापर, आर्डुइनो बोर्डचे प्रोग्रॅमिंग, क्लाउड कनेक्टिव्हिटी, डेटा मॉनिटरिंग यांसह स्मार्ट होम, स्मार्ट शेती आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन यांसारख्या प्रकल्पांची यशस्वी प्रात्यक्षिके सादर केली.

तीन दिवसीय कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून प्रा. पूनम गवळी यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. वैशाली चव्हाण यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी डॉ. सुभाष पिंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.