सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथे सेमिकंडक्टर उद्योगातील कौशल्ये व करिअर संधींवर ऑनलाईन वेबिनार*

 *सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथे सेमिकंडक्टर उद्योगातील कौशल्ये व करिअर संधींवर ऑनलाईन वेबिनार*



पंढरपूर : प्रतिनिधी

देशात वेगाने विकसित होत असलेल्या सेमिकंडक्टर व व्हीएलएसआय उद्योगातील करिअरच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सज्ज करण्याच्या उद्देशाने एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व ईटेल्सा यांच्या संयुक्त विद्यमाने “सेमिकंडक्टर उद्योगात करिअर घडवणे : आवश्यक कौशल्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती” या विषयावर दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. हा वेबिनार अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसादात व ज्ञानवर्धक वातावरणात संपन्न झाला.

या वेबिनारमध्ये श्री. शिवकुमार पी. आर. यांनी सेमिकंडक्टर उद्योगातील चिप डिझाइनचे वाढते महत्त्व, त्यामागील तांत्रिक प्रक्रिया व जागतिक पातळीवरील मागणी यांचा सखोल ऊहापोह केला. त्यांनी पूर्ण-सानुकूल (फुल कस्टम) व अर्ध-सानुकूल (सेमी कस्टम) एएसआयसी यांतील मूलभूत फरक, त्यांचे व्यावहारिक उपयोग, मर्यादा तसेच औद्योगिक पातळीवरील उपयोग स्पष्ट केले.

याशिवाय, एएसआयसी डिझाइन प्रक्रियेमधील फ्रंट-एंड व बॅक-एंड व्हीएलएसआय डिझाइन या टप्प्यांचे तांत्रिक व व्यावसायिक महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. एएसआयसी आणि एफपीजीए या तंत्रज्ञानांची तुलना करताना दोन्ही प्रणालींचे फायदे, मर्यादा व प्रत्यक्ष वापरातील भूमिका अधोरेखित करण्यात आली. तसेच सेमिकंडक्टर इकोसिस्टमची रचना, उद्योगातील विविध तांत्रिक व व्यवस्थापकीय भूमिका, तसेच व्हीएलएसआय क्षेत्रातील सध्याचे प्रवाह, रोजगाराच्या संधी व आवश्यक कौशल्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या वेबिनारमुळे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक माहितीच नव्हे, तर सेमिकंडक्टर व व्हीएलएसआय क्षेत्रातील करिअरची स्पष्ट दिशा, आवश्यक कौशल्यांचा अभ्यास व भविष्यातील संधींचे भान प्राप्त झाले.

याबाबत प्रतिक्रिया देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, उद्योगाभिमुख ज्ञान देणे आणि रोजगारक्षमतेत वाढ करणे हा अशा उपक्रमांचा मुख्य उद्देश असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.

या ज्ञानवर्धक उपक्रमात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या ७० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अमृता माळी, प्रा. स्वप्नील टाकळे तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad