पंढरपूर येथे भाजपमध्ये मान्यवरांचा जाहीर पक्षप्रवेश भीमा कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन कल्याणबप्पा पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश


पंढरपूर येथे भाजपमध्ये मान्यवरांचा जाहीर पक्षप्रवेश


भीमा कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन कल्याणबप्पा पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश



पंढरपूर :

पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील ज्येष्ठ नेते, भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन श्री. कल्याणबप्पा पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आयोजित करण्यात आलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार श्री. प्रशांत परिचारक व आमदार श्री. यशवंत (तात्या) माने हे प्रमुख उपस्थित होते.


या वेळी फुलचिंचोली येथील सरपंच श्री. नारायण जाधव, श्री. बिळणसिद्ध पुजारी, युवा नेते श्री. रमाकांत नाना पाटील यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास व्यक्त करत अधिकृत प्रवेश केला.


याप्रसंगी आमदार श्री. प्रशांत परिचारक यांनी बोलताना सांगितले की, कल्याणबप्पा पाटील यांचा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व जनतेशी असलेली घट्ट नाळ भाजपाच्या संघटनात्मक बळात मोलाची भर घालणारी ठरेल.

तर आमदार श्री. यशवंत (तात्या) माने यांनी पंढरपूर तालुक्यात भाजपाची ताकद सातत्याने वाढत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले.


यावेळी ज्येष्ठ नेते दिनकर भाऊ मोरे, दिलीपराव चव्हाण, दाजी पाटील भुसणर, सुभाष म्हस्के सर, कैलास खुळे सर, राजू बापू गावडे, बाबासाहेब पाटील, बंडू नाना पवार, भास्कर दादा कसगवडे, अतुल पवार यांच्यासह अनेक मान्यवर व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.


या पक्षप्रवेशामुळे फुलचिंचोलीसह पंढरपूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक भक्कम झाली असून आगामी काळात भाजप अधिक जोमाने जनसेवेचे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.