एस.के.एन. सिंहगड कॉलेजमध्ये कौशल्यवर्धनासाठी व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम्सचे यशस्वी आयोजन

 एस.के.एन. सिंहगड कॉलेजमध्ये कौशल्यवर्धनासाठी व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम्सचे यशस्वी आयोजन



पंढरपूर (प्रतिनिधी):

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात दिनांक २ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत द्वितीय वर्ष (एस.वाय.) व तृतीय वर्ष (टी.वाय.) यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विविध व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम्स यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्ये, उद्योगसुसंगत ज्ञान व व्यावहारिक अनुभव देऊन भविष्यातील रोजगारासाठी सज्ज करणे हा होता.

द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “हॅण्ड्स-ऑन प्रॅक्टिसेस ऑन मॅन्युफॅक्चरिंग अँड मेट्रोलॉजी टेक्निक्स” या विषयावर प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मशीन शॉप डेमॉन्स्ट्रेशन व जॉब प्रिपरेशन डॉ. ए. एस. आराध्ये, प्रा. एस. एस. साळुंखे, प्रा. ए. एस. कुलकर्णी व श्री. एस. पी. म्हेत्रे ), स्टिर कास्टिंग डेमॉन्स्ट्रेशन (प्रा. ए. एस. कुलकर्णी, प्रा. व्ही. व्ही. नवले), मेट्रोलॉजी अँड मेकॅनिकल मेजरमेंट्स लॅबोरेटरी (डॉ. एस. आर. कोळी, प्रा. डी. आर. गिराम), अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग लॅबोरेटरी (थ्री-डी प्रिंटिंग डेमो) (प्रा. यू. एस. घोलप, प्रा. ए. डी. जाधव, प्रा. ए. एस. गोडसे) तसेच पावडर मेटलर्जी लॅबोरेटरी (हॅण्ड्स-ऑन प्रॅक्टिसेस) (प्रा. एस. बी. महारनवर, प्रा. एम. डी. जोशी) यांचा समावेश होता.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील सैद्धांतिक ज्ञान व प्रत्यक्ष औद्योगिक कार्यपद्धतीतील अंतर कमी होण्यास मोठी मदत झाली.

तृतीय वर्षाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विभागामार्फत इंडो-जर्मन टूल रूम, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) यांच्या सहकार्याने सॉलीडवर्क्स २०२४ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात एकूण ९५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

हा प्रशिक्षण कार्यक्रम श्री. राज बनकर व श्री. प्रशांत चौधरी (इंडो-जर्मन टूल रूम) यांनी घेतला. प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना कॅड आधारित डिझाईन, मॉडेलिंग व उद्योगसुसंगत डिझाईन कौशल्ये प्रत्यक्ष स्वरूपात शिकविण्यात आली.

या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रसाद कुलकर्णी व प्रा. एच. एस. देशपांडे हे होते.

या सर्व व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम्ससाठी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे तसेच उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व मोलाचे पाठबळ लाभले. 

हे व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम्स विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण, उद्योगसुसंगत कौशल्ये व व्यावहारिक अनुभव प्रदान करणारे ठरले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी अधिक रोजगारक्षम, आत्मविश्वासपूर्ण व भविष्यासाठी सज्ज अभियंते म्हणून घडतात, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.