स्वेरीत 'राष्ट्रीय मतदार दिन' संपन्न विद्यार्थ्यांनी घेतली लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ


स्वेरीत 'राष्ट्रीय मतदार दिन' संपन्न

विद्यार्थ्यांनी घेतली लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ



पंढरपूर- महाराष्ट्र शासन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये 'राष्ट्रीय मतदार दिना'निमित्त रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.  

         भारत देश हा युवकांचा देश असून १८ वर्षे पूर्ण झालेल्या वयोगटातील तरुण युवकांना नवचेतना देऊन राष्ट्राच्या विकासाच्या दिशेने घेऊन जाणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. नवतरुणांना राष्ट्र उभारणीच्या कार्याचा एक भाग म्हणून मतदान करण्याबाबत जागृत करण्यासाठी त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे यासाठी स्वेरीमध्ये हा मतदार जनजागृतीचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली. शपथेचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले. यावेळी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सौ. मोहितकर, अॅड. ज्ञानेश आराध्ये, सौ. माधुरी गवंडी, स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, स्वेरीचे सचिव डॉ.सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मनियार, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. बी.चौंडे, रासेयोचे इतर अधिकारी, स्वयंसेवक, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad