कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.* २६ जानेवारी २०२६ रोजी कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 *कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.*





२६ जानेवारी २०२६ रोजी कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्व विषद केले. प्रजासत्ताक दिन म्हणजे स्वतंत्र भारतासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य आहेत आणी म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपली जबाबदारी ओळखून भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे.

एक चांगला विद्यार्थी हा एक चांगला व्यावसायिक बनतो, एक चांगला व्यावसायिक हा एक चांगला नागरिक बनतो आणि चांगले नागरिक एकत्र मिळून एक महान राष्ट्र घडवतात. तेव्हा सर्व भावी अभियंत्यांनी आपल्यातील कौशल्याने भारताला समृद्ध व विकसित व महान राष्ट्र बनवावे असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य प्रा.गुरुराज कुलकर्णी,फार्मसी कॉलेज चे प्राचार्य प्रा. एस एम जाधव, ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्या प्रा. एम आर शिंदे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके तसेच डिग्री अभियांत्रिकी,पॉलिटेक्निक, नर्सिंग, फार्मसी, ज्युनिअर कॉलेज चे सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad