एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम संपन्न*

 *एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम संपन्न*



पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक नियोजन तसेच व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन करणे हा होता.

या प्रसंगी विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक नियोजन, परीक्षा पद्धत, गुण मूल्यांकन, प्रकल्प कार्य, औद्योगिक भेटी, प्रशिक्षण व संशोधन कार्यक्रम तसेच नोकरी व इंटर्नशिपच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ स्वानंद कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे तसेच विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमास विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर ओरिएंटेशन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक सत्राबाबत स्पष्टता व प्रेरणा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.