पंढरपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची डॉ. प्रणिताताई भालके यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत तात्काळ पंचनामा करण्याच्या दिल्या सूचना...
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, तलाव आणि ओढे तुडुंब भरून वाहत असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.ग्रामीण भागातील शेती, पिके व पशुधन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसला आहे . त्या ठिकाणी बांधावर जाऊन पाहणी करून त्वरित पंचनामा करण्याच्या दिल्या आहेत. पंढरपूर तालुक्यात अनवली येथे अधिकाऱ्यांसमवेत अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करून त्वरित पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे, गेल्या आठवड्याभरापासून डॉ.प्रणिताताई भालके यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. ज्याठिकाणी पंचनामा करण्यासाठी अडचणी येतात तिथे प्रत्यक्षांत अधिकारी वर्गाला सोबत घेऊन किंवा फोनवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या अडचणींची सोडवणूक केली आहे. अडचणीतील जनतेची भेट घेऊन विचारपूस करत असताना नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फक्त पाहणी नाही तर प्रत्यक्ष मदतीची हमी अन् पंचनामा करताना येणाऱ्या अडचणी दूर करणाऱ्या नेत्या डॉ.प्रणिताताई भालके यांच्यामुळे तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.सणासुदीच्या काळात आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे आणि जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. “या कठीण काळात नागरिकांनी धीर सोडू नये. आपणच एकमेकांचा आधार आहोत. ज्या ठिकाणी अजूनही अडचणी उद्भवतात त्यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

