*पंढरपूर सिंहगडमध्ये “कॅरिअर पाथवेज़ इन द आयटी इंडस्ट्री” या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर : प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात मंगळवार, दिनांक ०२ सप्टेंबर २०२५ रोजी “कॅरिअर पाथवेज़ इन द आयटी इंडस्ट्री” या विषयावर माजी विद्यार्थीनी प्रणाली पिसाळ यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. याबाबतची माहिती विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या व्याख्यानात आयटी क्षेत्रातील विविध करिअर संधी, आवश्यक तांत्रिक कौशल्ये, सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व तसेच देश-विदेशातील आयटी उद्योगातील नवनवीन संधी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नोकरीसाठी तयारी करण्याचे धोरण आणि भविष्यातील करिअर घडविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी विद्यार्थीनी प्रणाली पिसाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विभागातील प्राध्यापकांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सोनाली गोडसे, प्रा. स्वप्निल टाकळे आदींसह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

