मांगल्य फाऊंडेशन ने दिला फुटपाथ वरील बेघर लोकांना मदतीचा हात*

 *मांगल्य फाऊंडेशन ने दिला फुटपाथ वरील बेघर लोकांना मदतीचा हात*



प्रतिनिधी 

 बिजलीनगर वस्ती राजभवन परिसर काटोलरोड नागपूर आणि अग्निशामक प्रशिक्षण केंद्र परिसर जिथे कितीतरी बेवारस वृद्ध महिला, पुरुष अगदी कृष (कुपोषित) अवस्थेत आहेत त्यांना दोन वेळ चे जेवण पण भीक मागून मिळवावे लागते फुटपाथवर ताडपत्रीचे घर बनउन राहतात प्रत्येकाची कहाणी वेगवेगळी आहे कोणाला लहानपणी मुलगी आहे म्हणून आईवडिलांनी रेल्वे स्टेशन वर आणून सोडून दिले.... तर कोणी पेन्शन असून ,त्यांच्या मुलांनी फक्त जिवंत ठेवण्यासाठी फुटपाथवर आणून सोडले काही घरांमध्ये ताडपत्री फाटल्यामुळे पावसाचे पाणी गळत होते त्यात अतिक्रमण वाल्यांनी फुटपाथवरील ताडपत्री ची घरे तोडफोड केली एकट्या निराधार वृध्द लोकांवर जनु आभाळच कोसळले मांगल्य फाऊंडेशन ला माहिती मिळताच लगेच तिथे भेट देऊन मदतीचा हात पुढे केला अशा वाईट परिस्थितीत मांगल्य ने निराधार वृद्धांच्या गळणाऱ्या घरांसाठी ताडपत्री , घालायला कपडे धान्याची ,किराणा आणि जीवन आवश्यक वस्तूची सोय करून दिली जेणेकरून जर्जर म्हाताऱ्याना भूक लागल्यावर भीक मागायची गरज पडू नये संस्थेच्या अध्यक्षा चैताली भस्मे आणि सदस्य ,शुभांगी मुडे, अमृता साखरकर ,सोनू ढोबळे , रवी रामटेके,नितीन गंधारे, किशोर साळवी ,यांनी या कार्यात मोलाचे सहकार्य केले त्याचप्रमाणे अनिल देव, PSI आसिफ शेख श्वेता कुलकर्णी ,यांनी उपस्थित राहून सहयोग केला मांगल्य फाऊंडेशन चे २००५ पासून ते आतापर्यंत समाजहिताचे कार्य अखंड अविरत सुरू आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad