एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “प्ले रायट विथ जावास्क्रिप्ट” विषयावर तज्ज्ञ व्याख्यान*

 *एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “प्ले रायट विथ जावास्क्रिप्ट” विषयावर तज्ज्ञ व्याख्यान*



कोर्टी (प्रतिनिधी):

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने “प्ले रायट विथ जावास्क्रिप्ट” या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या उपक्रमाची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सॉफ्टवेअर टेस्टिंग व ऑटोमेशन क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. सूर्यकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. Playwright हे आधुनिक आणि प्रभावी टूल विद्यार्थ्यांना सविस्तर समजावून देण्यासाठी या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानादरम्यान श्री. पाटील यांनी Playwright फ्रेमवर्कची वैशिष्ट्ये, जावास्क्रिप्ट सोबतचे एकत्रीकरण, मल्टी-ब्राउझर टेस्टिंग, ऑटो-वेट यंत्रणा, डिबगिंग टूल्स तसेच उद्योगातील प्रत्यक्ष उपयोग याबाबत सखोल माहिती दिली.

याशिवाय, वेब अनुप्रयोगांची चाचणी कशी अधिक सुलभ, कार्यक्षम आणि विश्वासार्ह पद्धतीने करता येते, याचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना उद्योगमान्य कौशल्ये आत्मसात करण्याची मौल्यवान संधी मिळाली.

कार्यक्रमाचे स्वागत आणि सूत्रसंचालन सौ. जयमाला हिप्परकर यांनी केले. संपूर्ण सत्राचे नियोजन संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 

या व्याख्यानात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे सत्र अधिक उत्साही व यशस्वी ठरले. विद्यार्थ्यांनी या सत्रातून मिळालेल्या ज्ञानाचा भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीत नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या उपक्रमाबाबत बोलताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले, “अशा तज्ज्ञ मार्गदर्शन सत्रांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो आणि त्यांना उद्योगजगतात आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळते”.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad