पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “रिअल टाईम डेटा प्रोसेसिंग इन आयओटी” विषयावर तज्ज्ञ व्याख्यान* पंढरपूर (प्रतिनिधी):

 *पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “रिअल टाईम डेटा प्रोसेसिंग इन आयओटी” विषयावर तज्ज्ञ व्याख्यान*




पंढरपूर (प्रतिनिधी):

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग व इनोवेशन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “रिअल टाईम डेटा प्रोसेसिंग इन आयओटी” या विषयावर दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.

या व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. विनायक ऐवळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. सध्या आयओटी आणि डेटा प्रोसेसिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री. ऐवळे यांनी “रिअल टाईम डेटा प्रोसेसिंग” या संकल्पनेचे सविस्तर विवेचन केले.

रिअल टाईम डेटा प्रोसेसिंग म्हणजे कोणत्याही डिव्हाइस किंवा सेन्सरकडून गोळा होणारा डेटा लगेचच (प्रोसेसिंग वेळ विलंब न होता) प्रक्रिया करून त्यावर निर्णय घेणे ही प्रक्रिया "रिअल टाईम डेटा प्रोसेसिंग" म्हणून ओळखली जाते. या प्रणालीमध्ये MQTT प्रोटोकॉल वापरून डिव्हाइस आणि सर्व्हरमधील संदेशांची देवाणघेवाण होते. डेटा जवळच्या डिव्हाइसवर एज संगणन तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केला जातो आणि नंतर तो अ‍ॅमेझॉन वेब सेवा (AWS) किंवा गुगल क्लाउड प्लॅटफॉर्मवर संग्रहित केला जातो. तसेच उद्योग व संशोधनातील उपयोग हे उत्पादन क्षेत्रातील ऑटोमेशन, स्मार्ट सिटी प्रकल्प, आरोग्य सेवा, वाहतूक नियंत्रण, आणि शेतीत याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आणि प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना डेटा कलेक्शन, विश्लेषण, क्लाउडवर साठवणूक आणि त्यावरील त्वरित निर्णयप्रक्रियेची माहिती दिली.

कार्यक्रमात विभागातील तृतीय व अंतिम वर्षाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सत्रादरम्यान विचारलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी तांत्रिक पातळीवर योग्य उत्तरे दिली.

प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी अशा तज्ज्ञ व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख होते व त्यांच्या कौशल्यविकासास मदत होते, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सोनाली गोडसे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी आनाम बेंद्रेकर आणि प्रथमेश आराध्ये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad