पंढरपूर सिहंगडमध्ये “अँडव्हान्स्ड मॅनुफॅक्चरिंग प्रोसेसेस ” या विषयावर व्याख्यान*

 *पंढरपूर सिहंगडमध्ये “अँडव्हान्स्ड मॅनुफॅक्चरिंग प्रोसेसेस ” या विषयावर व्याख्यान*




पंढरपूर, जुलै २०२५ - एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्ष बी.टेक. च्या विद्यार्थ्यांसाठी “अँडव्हान्स्ड मॅनुफॅक्चरिंग प्रोसेसेस ” या विषयावर एक माहितीपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 

कार्यक्रमाची सुरुवात यांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उद्घाटनाने झाली. त्यांनी अशा कार्यक्रमांचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांनी फक्त पाठ्यपुस्तकापुरती मर्यादा न ठेवता उद्योगातील नविनतम तंत्रज्ञान व व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे सांगितले.

या व्याख्यानाचे मार्गदर्शन प्रा. एस. ए. जेऊरकर यांनी केले. त्यांनी उत्पादन अभियांत्रिकीतील आधुनिक व उद्योगसंगत प्रक्रियांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. प्रमुख बाबींमध्ये एस.एल.एस. , एफ.डी.एम. / थ्रीडी प्रिंटींग, एस.एल.ए. आणि रॅपीड प्रोटोटायपिंग या प्रक्रिया समाविष्ट होत्या. विशेषतः, या प्रगत तंत्रज्ञानांचा वैद्यकीय क्षेत्रातील उपयोग यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

संपूर्ण सत्रात विद्यार्थ्यांनी उर्त्स्फूतपणे सहभाग घेतला. त्यांनी आपले प्रश्न विचारून शंका दूर केल्या आणि नवनवीन उपयुक्त अशी माहिती आत्मसात केली. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांचे औद्योगिक दृष्टीकोन, तांत्रिक समज व व्यावसायिक दृष्टिकोन अधिक दृढ झाले.

यांत्रिकी विभाग नेहमीच अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्योगाशी निगडित ज्ञानवृद्धीसाठी कटिबद्ध आहे.

हा कार्यक्रम प्रा. डी. आर. गिराम व प्रा. एस. सी. माळी यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

व्याख्यानाची सांगता प्रा. ए. एस. गोडसे यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.