*धनश्री परिवार सहकार क्षेत्रात पारदर्शकतेचा आदर्श — सहकार मंत्री बाबासाहेब पाटील*
मंगळवेढा (प्रतिनिधी)- सहकार क्षेत्रामध्ये सध्या विविध आर्थिक संस्थांकडून आकर्षक व्याजदरांचे आमिष दाखविले जात आहे. मात्र, अधिक व्याजाच्या लोभापेक्षा आपल्या ठेवींची सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर धनश्री परिवार हा अपवाद ठरत असून सहकार क्षेत्रात धनश्री परिवाराने पारदर्शकतेचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
धनश्री मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा शाखा आंधळगाव या शाखेचा नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे होते.
व्यासपीठावर सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा.डॉ.लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार धनाजी साठे, शिवसेना नेते प्रा.शिवाजीराव सावंत, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासकीय अधिकारी कुंदन भोळे, मंगळवेढा निबंधक व्ही. व्ही.वाघमारे, धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे, सिताराम शुगरचे संचालक सुयोग गायकवाड, ॲड. दिपाली काळुंगे-पाटील, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, दामाजी शुगरचे व्हा.चेअरमन तानाजी खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लतीफ तांबोळी, माजी जि.प. सदस्य शिवाजीराव नागणे, दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर, दामाजी शुगरचे माजी संचालक सुरेश भाकरे, शेती अधिकारी काशिनाथ पाटील, शिवसेनेचे प्रा.येताळा भगत, माजी सभापती प्रदीप खांडेकर, दामाजीचे माजी संचालक पांडुरंग भाकरे, माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, दामाजी शुगरचे संचालक दिगंबर भाकरे, शिवसेना (शिंदे गटाचे) तालुकाप्रमुख अशोक चौंडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, शिवरत्न पतसंस्थेचे माजी चेअरमन दत्तात्रय भाकरे, आंधळगावचे सरपंच लव्हाजी लेंडवे, मंगळवेढा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, राष्ट्रवादीचे ॲड. शिवानंद पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बाबासाहेब पाटील म्हणाले, आजपर्यंत 2 हजार कोटी ठेवी केवळ प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्यावर असलेल्या विश्वासावर ठेवी ठेवल्या असून कर्ज वाटप देखील केले जात आहे. अधिक जास्तीचे व्याज घेण्यापेक्षा आपल्या ठेवींची सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची आहे. धनश्री परिवारातील संस्थेने ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास संपादन करत काटेकोर व्यवस्थापन, आर्थिक शिस्त व पारदर्शक कारभार यामुळे एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. धनश्री परिवारातील तिन्ही संस्थेच्या जवळपास दोन हजार ठेवींचे योग्य व्यवस्थापन करणे ही सहज गोष्ट नाही; मात्र धनश्री परिवाराने हे यश प्रामाणिकपणे मिळवले आहे. सहकार चळवळीमध्ये 95 टक्के लोक चांगले काम करत आहेत. परंतु पाच टक्के वाईट मानसिकता असणाऱ्या लोकांमुळे सहकार चळवळ मागे पडत आहे. सहकार चळवळी बाबत सतत कायदे करण्यापेक्षा आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. सहकार चळवळ जोपासली पाहिजे. यासाठी राज्याचे सहकार विभाग ही सहकारी संस्थांमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करून सहकारी संस्थांच्या उन्नतीला चालना देण्यासाठी सहकार्याची भूमिका निभावणार आहे. सहकारी संस्थांनी आपली विश्वासाहर्ता टिकवण्यासाठी सहकार विभागाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून महाराष्ट्र राज्याचा विकास ग्रामीण भागात रुजलेल्या सहकार चळवळीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना अधिक बळ देण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निश्चित केले आहे. सहकार मंत्री यांनी पुढे सांगितले की, सहकार विभागाकडून संस्थांच्या नियमित तपासण्या व ऑडिट घेतले जातात. परंतु जेव्हा काही संस्था नियमबाह्य व अस्थिर आर्थिक व्यवहार करतात, तेव्हा त्याचा फटका सामान्य ठेवेदारांनाच बसतो. अशा बाबतीत संबंधित नियामक अधिकाऱ्यांनी तातडीने तपास करावा आणि आवश्यक ती कारवाई करावी.
सध्या देशात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या वेगाने वाढत आहे. या हल्ल्यांचे बळी केवळ बँकांचे ग्राहकच नाही, तर थेट बँकांची यंत्रणाही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य बँक आणि नागरी तसेच जिल्हा बँकांच्या सुरक्षिततेसाठी नवी सायबर सुरक्षायंत्रणा उभारली जाणार आहे. असेही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
आमदार समाधान आवताडे म्हणाले, धनश्री परिवाराने सुरुवातीला खडतर प्रवास करत मोठ्या दिमाखात धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेट या संस्था प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी नावारूपाला आणली आहे. दुष्काळी भागात आर्थिक संस्था सुरू करून धनश्री मल्टीस्टेटच्या आंधळगाव शाखेने 70 कोटी ठेवी जमा केले आहेत जे खूप कौतुकास्पद आहे.
धनश्री परिवाराने ठेवीदारांचा विश्वास संपादन करून 2 हजार कोटी ठेवी संस्थेकडे जमा केल्या आहेत. ठेवी मिळणे खूप सोपे आहे परंतु संस्थेला चांगले कर्जदार मिळवणे फार अवघड असते. चांगले कर्जदार शोधून त्यांना कर्ज देऊन 100 टक्के वसुली करणे काय असते ते धनश्री पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेट यांच्याकडून शिकले पाहिजे. योग्य व्यक्तीला कर्ज देऊन 100 टक्के वसुली होणे खूप गरजेचे आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांना पैशाबरोबर पाण्याची आवश्यकता फार महत्त्वाचे असते. आजपर्यंत मंगळवेढा तालुक्यातील राजकारण हे पाण्याभोवती फिरत होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली याला आपण आता पूर्णविराम दिला आहे. मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी उपयुक्त असणारी 24 गावासाठी असणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना 700 कोटींची मंजूर असून पहिला टप्पा लवकरच पूर्ण होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील टेंडर सुद्धा निघणार आहे. अधिकाऱ्यांना काम सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणे खूप अवघड होते. 1996 साली धनश्री पतसंस्था सुरू करून तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करत आहोत. धनश्री महिला व मल्टिस्टेटच्या माध्यमातून अनेक गरजूवंतांना कर्ज स्वरूपात मदत करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे.
शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता यासाठी स्व. नागनाथआण्णा नायकवडी, स्व. डॉ. भाई गणपतराव देशमुख व इतर सहकाऱ्यांच्या सोबतीने पाणी परिषदेची स्थापना केली. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागातील लोकांसाठी पाण्याचे स्वप्न बघितले, त्यावेळी हे पाणी दुष्काळी भागात येईल यावर लोकांना विश्वास बसत नव्हता. परंतु आता ते सत्यात उतरले आहे. भाई गणपतराव देशमुख यांनी या चळवळीच्या माध्यमातून व विधिमंडळाच्या सभागृहात सभागृहाचे नेते म्हणून फार मोठे योगदान दिले आहे. मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांच्या दुष्काळी भागासाठी असणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी प्राधान्याने लक्ष देऊन पूर्ण करावी असे आवाहन प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिताराम शुगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी व्हा चेअरमन युवराज गडदे, प्रा. मारुती सावंत, सतीश दत्तू राजाराम सावंत, डॉ. मारुती टकले, ज्ञानदेव जावीर, यादाप्पा माळी, रामचंद्र बंडगर, शकुंतला नानासाहेब लिगाडे, उद्योजक उद्धवबापू बागल, भीमा शुगर व्हा. चेअरमन सतीश जगताप, ईश्वर गडदे, माजी सरपंच महादेव माळी, अनिल पाटील, कैलास मसरे, दिगंबर भगरे, लहू ढगे, राजेश पाटील, देविदास इंगोले, संजय पाटील, समाधान इमडे, विलास सरगर, आनंदा बेहरे, विकास इमडे, हिम्मतराव भाकरे, नेताजी चव्हाण, तनवीर मुलाणी, चेअरमन बंडू लेंडवे, मोहसीन मुलाणी, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांचेसह पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ या तालुक्यातून ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच धनश्री व सिताराम परिवाराचे सर्व संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी इंद्रजीत घुले व संतोष मिसाळ यांनी केले.

