विद्यापीठ परीक्षेत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी क्रमवारीत
३७४ पैकी १६७ जण डिस्टिंक्शनसह प्रथम
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रथम वर्षाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निकालात एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने यश संपादन करुन आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा अबाधित ठेवली.
विद्यापीठ क्रमवारीत पहिल्या ११ मध्ये सिंहगड महाविद्यालयाच्या सय्यद झेद (९२.६७ टक्के) , प्रगती जाधव (९०.३३ टक्के), शुभम पेठे ( ९० टक्के ) या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आठ विद्यार्थ्यांनी १० पैकी १० जीपीए मिळवले आहे. ३७४ पैकी १६७ जणांनी डिस्टिंक्शनसह प्रथम श्रेणी मिळवली आहे. ४३ विद्यार्थ्यांनी 'ओ' ग्रेड (उत्कृष्ट श्रेणी) मिळवला आहे. विद्यापीठ क्रमवारीत पहिल्या ११ मध्ये ३ विद्यार्थी सिंहगड सोलापूरचे आहेत.
तसेच मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात (बी टेक) रितेश साठे, धनश्री कोकाटे, इराफान सक्करगे, आदित्य बागेवाडी, कोमल आवताडे यांनी विद्यापीठ रॅकमध्ये यश मिळवले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागात (बी टेक) द्वितीय वर्षात परेश नावेदसाब फय्याज, आकांक्षा शेटे, राजश्री नरूने, शेवटच्या वर्षांमध्ये नेहा पाटील, श्वेता कोंढारे, प्रतीक्षा कुलकर्णी तर तृतीय वर्षांमध्ये रिद्धी पाटील, पियुष लासने, कार्तिक नारवाडे या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ रॅकमध्ये यश मिळवले आहे. विद्युत अभियांत्रिकी विभागात सुजाता दुधभाते, प्रगत जाधवर यांनी यश मिळवले.
संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्ष बी. टेकमध्ये
मोनाली करनावर, श्रावणी शिरसाट, ओंकार नागुल, विद्या हत्तुरे, अंजली पवार यांनी यश मिळवले. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या शेवटच्या वर्षात सरस्वती साळुंके, आरती माने, प्राजक्ता काळे यांनी विद्यापीठ रॅकमध्ये यश मिळवले.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे, डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ .विजय बिरादार, डॉ . प्रदीप तापकीरे, प्रा. के एस पाटील, प्रा. एच टी गुरमे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

