पंढरपूर सिंहगड मधील इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड

 *पंढरपूर सिंहगड मधील इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड*



पंढरपूर: प्रमोद बनसोडे


 १५ सप्टेंबर हा दिवस सर मोक्षगुण्डम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवस असतो या जन्मदिवसाचे औचित्य साधून इंजिनिअर्स डे साजरा करण्यात येत असतो या दिवसाचे औचित्य साधून एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाला यावर्षीचा बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड देण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

    एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंजिनिअर्स डे निमित्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, प्रकाशक आणि संपादक असलेले अमोल कदम हे होते. यांच्या उपस्थितीत सर मोक्षगुण्डम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

   यादरम्यान प्रमुख पाहुणे यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे हस्ते शाल, विठ्ठल मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

 चालू वर्षीचा बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाला देण्यात आला. हा पुरस्कार इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी स्विकारला या अवॉर्डचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असुन विभागातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येत असतो.

  इंजिनिअर्स डे निमित्त प्रमुख पाहुणे अमोल कदम, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आदींनी उपस्थितांना संबोधित केले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, प्रा. अभिजित सवासे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वरदा बिडकर व सानिका बाबर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. दिपक गानमोटे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad