पंढरपूर सिंहगडच्या निखिल बागल यांची ४ कंपनीत निवड* ○ कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ६ लाख पॅकेजची नोकरी

 *पंढरपूर सिंहगडच्या निखिल बागल यांची ४ कंपनीत निवड*


○ कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ६ लाख पॅकेजची नोकरी



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले करगणी (ता. आटपाडी) येथील निखिल दिपक बागल यांची ४ कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.

   एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच निखिल दिपक बागल यांनी टेक्नोहूक (वार्षिक पॅकेज ६ लाख), न्यूमेट्री टेक्नॉलॉजीज (वार्षिक पॅकेज ३ लाख), ट्रायन्झ डिजिटल (वार्षिक पॅकेज ४.२५ लाख) आणि बेलरिस इंडस्ट्रीज लिमिटेड आदी ४ कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असून निखिल बागल हे ट्रायन्झ डिजिटल कंपनीत मध्ये सप्टेंबर २०२४ मध्ये रुजू होणार आहेत.

     ट्रायन्झ डिजिटल कन्सल्टींग ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीने जगभरातील ५ हजार हून अधिक कंपन्यांच्या डेटासह डिजिटल ट्रान्सफाॅर्मेशनवरील सर्वात मोठा डेटा बेस तयार करण्यास गुंतवणूक केली आहे. अशा या कंपनीत निखिल बागल यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.