पंढरपूर सिंहगडची शर्वरी दिवेकर पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीला रवाना*

 *पंढरपूर सिंहगडची शर्वरी दिवेकर पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीला रवाना*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेली कुमारी शर्वरी शामराव दिवेकर ह्या नुकत्याच अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीला रवाना झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

     पंढरपूर येथील रहिवासी असलेली कुमारी शर्वरी शामराव दिवेकर हिने एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पदवीचे शिक्षण पुर्ण केले होते. दरम्यान महाविद्यालयातील कॅम्पस प्लेसमेंट मधुन तिची सिमेन्स कंपनी निवड झाली होती. सिमेन्स कंपनी मध्ये शर्वरी दिवेकर हिने चार वर्षे नोकरी केल्यानंतर ती आता जर्मनी येथील हार्ज विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी जात आहे. जर्मनी येथील हार्ज युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड स्टडीज ही जर्मनीतील सर्वात प्रतिष्ठित संस्थापैकी एक असुन या युनिव्हर्सिटीत पंढरपूर सिंहगड मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी संधी मिळत असल्याने पालकांकतुन सिंहगड काॅलेज चे अभिनंदन व कौतुक होत आहे.

  कुमारी शर्वरी दिवेकर हिच्या जर्मनी येथील पदव्युत्तर शिक्षणासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. शाम कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, डाॅ. अतुल आराध्ये, डाॅ. श्रीगणेश कदम, डाॅ. सुभाष पिंगळे, डाॅ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. संपत देशमुख, डाॅ. यशवंत पवार, प्रा. विनोदकुमार मोरे, प्रा. अनिल निकम आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad