*डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत सांगोल्यात आज शेकापक्षाची बैठक*
------------------------
सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या.. पुरोगामी युवक संघटनेच्या व स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब व डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या वरती नितांत प्रेम करणाऱ्या नेते , कार्यकर्ते, पदाधिकारी यांना कळविण्यात येते की आज गुरुवार दिनांक ७ मार्च २०२४ रोजी दुपारी १-०० वाजता स्व गणपतरावजी देशमुख सह.सुतगीरणी सांगोला येथे महत्वाची बैठक डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत बोलवण्यात आली आहे..
सध्या सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे चारा व पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्या वर योग्य उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी मा.तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे..तरीही प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास भाग पाडण्यासाठी पक्षीय पातळीवर पुढील दिशा या बैठकीत ठरविण्यात येणार आहे.
तसेच राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती विचार करून सांगोला विधानसभा मतदार संघातील राजकीय परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आसुन, येणाऱ्या काळात शेतकरी कामगार पक्षाची भुमीका यावरती चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे..
तसेच काही महत्वाचे आयत्या वेळेस येणारे विषय आहेत त्यावरती सुध्दा चर्चा करण्यात येणार आहे तरी सांगोला विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे व पुरोगामी युवक संघटनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच स्व डॉ आबासाहेब व डॉ भाई बाबासाहेब यांच्या वरती प्रेम करणाऱ्या सर्वांनी स्व गणपतरावजी देशमुख सह.सुतगिरणी येथे उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाने व पुरोगामी युवक संघटनेने केले आहे