आ समाधान आवताडे यांचे नेतृत्व म्हणजे संवेदनशील मानवतेचे प्रतीक - ह.भ.प राणा महाराज वासकर

 आ समाधान आवताडे यांचे नेतृत्व म्हणजे संवेदनशील मानवतेचे प्रतीक - ह.भ.प राणा महाराज वासकर



प्रतिनिधी - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाची कार्यशैली म्हणजे संवेदनशील मानवतेचे आणि जनसामान्यांच्या सेवेठायी निर्माण झालेल्या नैतिकतेचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गगार ह.भ.प.देववृत्त राणा महाराज वासकर यांनी व्यक्त केले आहेत. आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त साधू वासवानी मिशन पुणे यांच्या सहकार्याने मोफत कृत्रिम पाय व हात वाटप शिबिर श्री संत तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे संपन्न झाले. सदर कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून आपले मत मांडताना वासकर महाराज हे बोलत होते.

मतदार संघातील जवळपास ३८४ दिव्यांग बंधू-भगिनींना आमदार अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार समाधान आवताडे वाढदिवस संयोजक समिती यांच्या संकल्पनेतून मोजमाप घेण्यात आलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत कृत्रिम पाय व हात वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.रत्नाकर महाराज मठ तनाळी मठाधिपती ह.भ.प.दाजी महाराज हे व्यासपीठावर उपस्थित होते.

सर्वसमावेशक समाजकारण आणि सलोख्याचे राजकारण यांची विधायक कार्यपद्धती आपल्या कार्यसेवेतून पुढे नेत असताना आमदार समाधाना आवताडे यांनी नेहमीच समाजातील विविध घटकांना निरनिराळ्या रूपामध्ये मदत करून त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे अनमोल कार्य केले आहे. अतिशय उज्वल राजकीय भविष्य असणाऱ्या या लोकप्रतिनिधीने जात, पात धर्म, पंथ यांना कधीही थारा न देता समाजातील प्रत्येक घटकांना सोबत घेऊन मतदार संघाच्या परिवर्तनाचे स्वप्न भरघोस निधीच्या रूपाने पूर्ण केल्याचा मनस्वी आनंद आणि समाधान येथील जनतेच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. पोस्टरबाजी व बॅनरबाजी करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीद्वारे आपल्या नेतृत्वाचे कौशल्य दाखवणारे आमदार समाधान आवताडे हेच येणाऱ्या पुढील काळामध्ये सुद्धा मतदार संघाचे नेतृत्व करताना दिसतीलच परंतु मतदार संघाला मंत्रीपद सुद्धा लाभेल असा मोठा आशावाद दाजी महाराज यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमा वेळी आमदार आवताडे यांनी आपले मनोगत मांडताना सांगितले की, जनतेच्या सेवेसाठी आजपर्यंत केलेल्या कार्यातून जेवढा आनंद व समाधान प्राप्त झाले त्यापेक्षाही मोठा आनंद आपल्याला आजच्या कार्यक्रमातून जाणवला आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त वायफळ गोष्टीवर खर्च करून बडेजाव करण्यापेक्षा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकाउपयोगी राबवून जनतेप्रती असणारे जिव्हाळ्याचे नाते आणखी मजबूत केले आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशाच लोकाभिमुख कार्यक्रमांची मालिका अविरतपणे चालू ठेवून लोकांच्या सेवेचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितले आहे. कोणत्याही प्रकारच्या अटी व शर्ती समोर न ठेवता साधू वासवानी मिशन पुणे यांनी सहकार्याची व समन्वयाची भूमिका ऊराशी बाळगून या कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य केले व लोकांची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दलही आ आवताडे यांनी आभार व्यक्त केले.

*चौकट-* या कार्यक्रमामध्ये चंद्रकला काटे या लाभार्थी भगिनीने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, देवळात जाऊन देव भेटतो की नाही ही मला माहित नाही परंतु आमच्या दिव्यांगांसाठी आ समाधान आवताडे यांनी मोफत कृत्रिम पाय व हात दिल्याने आम्हाला त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष श्री.विठ्ठलाचेच दर्शन झाले असे सांगत त्या भगिनीने आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली व संपूर्ण कार्यक्रमामध्ये अतिशय भावनिक वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख, पंढरपूर मर्चंट बँकेचे संचालक नागेश भोसले, मा. नगरसेवक दीपक वाडदेकर, तुकाराम कुरे, श्री.श्री. सद्गुरू चे संचालक मोहन बागल श्री विठ्ठल शुगर माजी संचालक द्रोणाचार्य हाके, विनोदराज लटके,सुनील डोंबे, संजय ननवरे, दत्तात्रय काळे, हनुमंत ताठे,बापूसाहेब कदम ,संतोष डोंगरे,दत्ता आबा पाटील,भास्कर तात्या जगताप, शेखर बंटी भोसले,श्री.प्रसाद भैया कळसे, दीपक येळे मेंबर धीरज मामाने नितीन करंडे प्रवीण पिसाळ, महेश येडगे.श्री.अनिकेत देशमुख, भास्कर घायाळ, समाधान देठे, महादेव मासाळ, बालम मुलाणी,भारत रणदिवे, सुधाकर नाना फाटे,संदीप माने,शरीफ भाई शेख,अनिल दादा नागटिळक, दादसो घायाळ,लखन माने,राहुल गावडे,पांडुरंग वाडेकर, पांडुरंग करकमकर, आकाश आटकळे अण्णासो फाटे, सुरज राठी, संभाजी कुरे गुरुजी, दत्तात्रय शिंदे, वैभव ननवरे, प्रवीण पिसाळ, राजेंद्र हुंडेकरी, जगन्नाथ जाधव, शिवाजी पवार, बाळासाहेब जाधव, आमीन शेख, संभाजी पाटील,आतिक मुलाणी, बापूसो गोडसे, सदां आण्णा मस्के, परमेश्वर पाटील, हनुमंत ताटे,विष्णू भूसे, किसन पवार,उमेश खताळ सुनील रणदिवे .सज्जन जाधव,प्राजक्ता बेणारे, जयश्री क्षीरसागर, ज्योती जोशी सुजाता वगरे व समाधान दादा अवताडे प्रेमी आदी मान्यवर व इतर नागरिक आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad