पंढरपुर सिंहगड मध्ये प्रा. सोमनाथ पिसे यांचे व्याख्यान*

 *पंढरपुर सिंहगड मध्ये प्रा. सोमनाथ पिसे यांचे व्याख्यान*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. सोमनाथ पिसे यांचे " माॅडिफाईड इंडियन ड्राईव्ह सायकल फाॅर इलेक्ट्रिकल व्हेईकल" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान प्रमुख पाहणे प्रा. सोमनाथ पिसे यांनी या कार्यशाळेत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. राहुल शिंदे यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेकॅनिकल विभागातील हरिप्रिया कुलकर्णी आणि विश्वेश्वरी कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. राहुल शिंदे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.