पंढरपूर सिंहगडच्या राहुल चव्हाण ची "व्हरटेक्स डिझाईन अँड मॅनेजमेंट" कंपनीत निवड*

 *पंढरपूर सिंहगडच्या राहुल चव्हाण ची "व्हरटेक्स डिझाईन अँड मॅनेजमेंट" कंपनीत निवड*




पंढरपूर: प्रतिनिधी


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असतानाच कुमार राहुल रविकांत चव्हाण यांची "व्हरटेक्स डिझाईन अँड मॅनेजमेंट कंपनीत " कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख म्हणून डाॅ. श्रीगणेश कदम यांनी दिली.

 "व्हरटेक्स डिझाईन अँड मॅनेजमेंट" या कंपनीचे जगातील पाच देशामध्ये कार्यालय असुन या कंपनीची स्थापना पुणे येथे २०११ साली झाली आहे. हि कंपनी १८० हून अधिक जागतिक कंपन्यांना आर्किटेक्चर डिझाईन ची सेवा प्रदान करते. अशा या "व्हरटेक्स डिझाईन अँड मॅनेजमेंट" कंपनीत राहुल चव्हाण यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ३.२५ लाख रूपये वार्षिक पगार मिळणार आहे.

 "व्हरटेक्स डिझाईन अँड मॅनेजमेंट" कंपनीत निवड झाल्याबद्दल राहुल चव्हाण यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अमोल कांबळे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad