*पंढरपूर सिंहगडच्या ५ विद्यार्थ्यांना ८ लाखांपेक्षा जास्त पॅकेजची नोकरी*
○ चालू शैक्षणिक वर्षांत २०० हून अधिक नामांकित कंपनीत पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या ५ विद्यार्थ्यांना नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत ८ लाखांपेक्षा जास्त पॅकेजची नोकरी मिळाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राकडून अलीकडच्या काळात खुप मोठ्यात प्रमाणात मागणी वाढत आहे. विद्यार्थ्यांचा वाढत कल लक्षात घेता प्लेसमेंटसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण, नामांकित कंपन्या, दर्जेदार प्लेसमेंट, बहुराष्ट्रीय कंपन्यांची उपलब्धता महाविद्यालयांमध्ये असणे आवश्यक असते. कंपन्यांची गरज काय आहे ? हे ओळखून पंढरपूर सिंहगड महाविद्यालय विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्याचे कौशल्य देण्यासाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालय सतत प्रत्नशील आहे. महाविद्यालयात चतुर्थ वर्षांमध्ये शिक्षण घेत असतानाच नामांकित मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे.
या वर्षीच्या पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील चैतन्य चंद्रशेखर कोळे यांची पीटीसी कंपनीत, शंकर विलास चव्हाण यांची अदेन्झा, उज्ज्वला सूर्यकांत मेहर यांची राॅकवेल ऑटोमेशन, अविनाश औदुंबर भिलारे यांची भारत नेक्स्ट कंपनीत आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विजय भागवत शेळके यांची हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन या सर्व विद्यार्थ्यांना कंपनीकडून ८ लाखांपेक्षा जास्त वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
महाविद्यालयातील विविध कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.