पाटणबोरी येथे मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

 *पाटणबोरी येथे मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी.*



मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार संघ शाखा पाटणबोरी यांच्या वतीने साजरी करण्यात आली. या वेळीस ज्येष्ठ पत्रकार मोबीन जाटू, सचिन पत्रकार,सचिन गुडेटवार,गोपाल शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरी झाली.यावेळी मराठी पत्रकार संघ शाखा पाटणबोरी येथील अध्यक्ष विनोद कनाके यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले व तसेच मराठी पत्रकार संघ शाखा पाटणबोरी वृत्तपत्र व सोशल मीडिया चे सर्व पत्रकार बांधवांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.


यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कनाके,शुभम बावने अमन सिडाम नीलेश सिडाम अक्षय तोटावार संकोज चांदेकर हे उपस्थित होते.

*यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-शुभम बावणे*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.