पत्रकार दिनानिमित्त इस्लापूर पोलिस ठाण्याच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

 पत्रकार दिनानिमित्त इस्लापूर पोलिस ठाण्याच्या वतीने पत्रकारांचा सन्मान



किनवट प्रतिनिधी : विशाल भालेराव



इस्लापूर : पत्रकार दिनानिमित्त इस्लापूर पोलिस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या शुभहस्ते इस्लापूर परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा शाल श्रीफळ हार घालून सन्मान करण्यात आला .

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म दिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो . त्या अनुषंगाने इस्लापुर पोलिस स्टेशन च्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून इस्लापूर पोलिस ठाण्यात पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी सहाय्यक पोलिस निरिक्षक रघुनाथ शेवाळे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्व पत्रकाराचे स्वागत केले व सर्व इस्लापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेले या भागातील व परिसरातील जेष्ठ पत्रकार गंगाराम गड्डमवाड , नारायण दंतलवाड , गौतम कांबळे , परमेश्वर पेशवे, गणेश जैस्वाल, विलास भालेराव ,ईश्वर जाधव, प्रेम जाधव , युवा पत्रकार गजानन वानोळे , किरण वानखेडे , विशाल भालेराव , रावसाहेब कदम , दशरथ आंबेकर, प्रमोद जाधव , राजेश गायकवाड, इम्रान घोडके , उपस्थित पत्रकारांना शाल श्रीफळ हार घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी इस्लापूर पोलिस प्रशासनाचे कर्मचारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निवळे पाटील बीट अमलदार कांबळे साहेब , गणेश पोतुलवार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.