श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीने लोहा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

 श्री संत गाडगे महाराज  महाविद्यालयाच्या वतीने लोहा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांच्या जयंती निमित्त  अभिवादन 

-------------------------------




लोहा नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष दिवंगत माणिकराव गणपतराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथे दिनांक १३-१-२०२३ रोजी अभिवादन व आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रांगणामधील हुतात्मा स्मारका जवळील माणिकराव पाटील पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्यास महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.व्ही जी चव्हाण साहेब,व डॉ.एस व्ही मंडगे, डॉ.डी एम पवार सर,यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकालय वृद्धांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी बोलताना श्री व्हि जी चव्हाण साहेब यांनी नगरपालिका व तालुका निर्मितीसह माणिकराव पाटलांच्या कार्यात केशवराव धोंडगे साहेबांच्या सहकार्यांचा व नेतृत्वाचा जिव्हाळ्याचा उल्लेख करून धोंडगे साहेबांच्या अथक प्रयत्नात माणिकराव पाटलांचे त्याग असल्याचे प्रतिपादन केले यावेळी कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक डॉ.जयराम सूर्यवंशी सर यांनी केले तर आभार डॉ. डी एम पवार सर यांनी माडंले यावेळी वरील मान्यवरांसह महाविद्यालयातील प्रा.डॉ नानासाहेब गायकवाड, प्रा. डॉ  शिवराज मंगनाळे,प्रा.अमृत जाधव 

,प्रा.डॉ मोरे एच डी, प्रा.डॉ मुंडे, प्रा. चालिकवार व्हि बी, ग्रंथालय  विभागाचे राजेश गोरे सर, प्रा.डॉ एल एस रावणमावे, प्रा.नवनाथ बेंडे, बिडी जाधव सर, प्रा. डॉ अर्जुन मोरे प्रा.डॉ शैलेश महाबळे, प्रा. बी एम कदम, प्रा.कांबळे एस एस, प्रा. घाटोळ एस एम,श्री वी वी बोंढारे, श्री जी बी कदम,श्री जी सी सूर्यवंशी, श्री हरिहर मुरुडकर, श्री संजय काळे, श्री बि डी कदम श्री मदन गडमवाड, जि.प वस्तीग्रह चे प्रभारी शेख सर पत्रकार शुभम सावकार उत्तरवार, पत्रकार शिवहार गालफाडे व विद्यार्थी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad