*ब्रह्मपुरी जिल्हा बाबा याकरिता माजी आमदार प्रा अतुल भाऊ देशकर व भाजपचा पुढाकार...*
प्रतिनिधी-सुरज सुर्यवंशी
ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा याकरिता भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी येथील कार्यालयात भाजपा नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या पुढाकाराने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
या संदर्भात 16 डिसेंबर रोजी राज्याचे आमचे नेते, कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे ब्रह्मपुरी ला आले असता ब्रह्मपुरी जिल्हा करावा या मागणीचे निवेदन माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले.
या सोबतच ब्रह्मपुरी पत्रकार संघ, रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), बार असोसिएशन ब्रह्मपुरी यांना ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा या मागणीचे निवेदन देण्याची विनंती माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी केली असता त्यांनी सुद्धा मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे ब्रह्मपुरी जिल्हा करावा या मागणीचे पत्र सादर केले.
आता पुढे ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा या करिता ब्रह्मपुरीला लागून असलेल्या इतर तालुक्यातील लोकप्रतिनिधींची भेटी घेऊन ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा या दृष्टीने आम्ही संघर्ष करणार आहोत असे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी सांगितले. या सोबतच ब्रह्मपुरीतील इतरही मान्यवरांची भेट घेणार असल्याचे ही ते या वेळी म्हणाले.
या बैठकी प्रसंगी भाजपा प्रदेश कार्य. सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रा. अरुण शेंडे, भाजपा शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर, माजी पं. स सभापती प्रा. रामलाल दोनाकडर, नगरसेवक तथा महामंत्री मनोज वठे, भाजपा महामंत्री मनोज भूपाल, माजी उपसभापती नामदेव लांजेवार, नगरसेविका पुष्पा गराडे, साकेत भानारकर, तनय देशकर, सुयोग बाळबुधे, भाजपचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.