*भाजपने फुंकला पाकिस्तानी विदेश मंत्र्याचा पुतळा.*
*पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बाबत अवमानकारक बोलल्याप्रकरणी माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे नेतृत्वात भाजपा ब्रह्मपुरीचे निदर्शने.*
प्रतिनिधी-सुरज सुर्यवंशी
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावर भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सभेत अवमानकारक वक्तव्य केले. या प्रकरणी बिलावल भुट्टो चा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी च्या वतीने भाजपचे नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने बिलावल भूट्टो च्या पुतळ्याचे दहन करून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. निषेध मोर्चा भाजपा कार्यालय ब्रह्मपुरी पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यत काढण्यात आला. मोर्च्यामध्ये पाकिस्तान आणि बिलावल भुट्टो यांचे विरोधी नारे देण्यात आले. पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी प्रचंढ घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
याप्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहर अध्यक्ष इंजिनिअर अरविंद नंदुरकर, माजी सभापती तथा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रा.रामलाल दोनाडकर, नगरसेवक तथा महामंत्री मनोज वठे, महामंत्री मनोज भूपाल, माजी सभापती तथा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ वंदना शेंडे, माजी उपसभापती नामदेव लांजेवार, भाजपा जिल्हा सचिव रश्मी खानोरकर पेशने, साकेत भानारकर मन की बात कार्यक्रम शहर संयोजक,गोपाल कावळे, प्रा. संजय लांबे, नगरसेविका पुष्पा गराडे, माजी नगरसेविका अनघा दंडवते, माजी नगरसेविका सौ. हेमलता नंदूरकर, माजी नगरसेवक संजय बावनकुळे, माजी नगरसेवक विक्रम कावळे, रहमान खान पठाण, भा.ज.यु.मो जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननावरे,श्री.गजानन पेट्रोलीयमचे संचालक तथा भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर,भा.ज.यु.मो शहर अध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुध्दे, महिला आघाडी जिल्हा सचिव सौ. मंजिरी राजनकर, भा.ज.यु.मो शहर महामंत्री रितेश दशमवार, स्वप्नील अलगदिवे, उपाध्यक्ष अमित रोकडे, पवन जयस्वाल, पंकज माकोडे, प्रमोद बांगरे, सचिव दत्ता येरावार, प्रशांत वसाके, जुमडे सर राहुल सुभेदार, अरुण बनकर, नलिनी बगमारे, रितू सेठीये, राजू भागवत यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.