भाजपा युवा मोर्चाच्या लोहा शहर उपाध्यक्षपदी प्रसाद (बंटी) देशमाने यांची निवड

 भाजपा युवा मोर्चाच्या लोहा शहर उपाध्यक्षपदी प्रसाद (बंटी) देशमाने यांची निवड

--------------------------------------



 नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार




भाजपा युवा मोर्चाच्या लोहा शहर उपाध्यक्षपदी प्रसाद (बंटी) देशमाने यांची निवड करण्यात आली.

 भाजपचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या लोहा येथील जनसंपर्क कार्यालयात काल दि. १९ डिसेंबर रोजी भाजपा युवा मोर्चाची बैठक संपन्न झाली.

 यावेळी या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून  भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस सौ. प्रणिताताई देवरे ,  भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख,भाजपचे लोहा तालुकाध्यक्ष आनंद पाटील शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे लोहा तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे, उपनगराध्यक्ष दता भाऊ वाले, भाजपचे लोहा न.पा.चे गटनेते करीम शेख,  नगरसेवक भास्करराव पाटील पवार, माजी नगरसेवक अप्पाराव पाटील पवार, युवा नेते सचिन मुकादम, युवा नेते दिपक पाटील कानवटे , शहाजी पाटील पवार, व्यंकट जंगले, जगन्नाथ नायके, अजय पवार सतीश नायके, सचिन उदांडे, आदी उपस्थित होते.

 यावेळी लोहा शहरातील सक्रीय कार्यकर्ते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व आरएसएस चे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रसाद (बंटी) देशमाने यांची भाजपा युवा मोर्चाच्या लोहा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सदरील निवडीचे पत्र प्रसाद देशमाने यांना भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सौ. प्रणिताताई देवरे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad