दैनिक साम्राज्य चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने यशवंत पवार सन्मानित*

 *दैनिक साम्राज्य चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने यशवंत पवार सन्मानित*



ठाणे (प्रतिनिधी )

 वंचित पीडित अन्यायग्रस्त सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी खऱ्या खुऱ्या पत्रकारांची भूमिका बजावणारे सडेतोड लेखन परखड बातमी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आपल्या लेखणीच्या अचूक माराने प्रशासनाला घाम फोडणारे साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांना दैनिक साम्राज्य वृत्तपत्राचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देण्यात आला अनेक मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ठाणे येथील हॉटेल रॉयल इन सभागृहामध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन यशवंत पवार यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी ठाणे येथील ज्येष्ठ समाजसेवक अशोक संमेळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे उल्हासनगर अग्निशामक दलाचे प्रमुख बाळासाहेब नेटके उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी बदलापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी योगेश गोडसे अभिनेते दिग्दर्शक अमोल भावे अभिनेत्री श्रद्धा हांडे दैनिक साम्राज्य चे संपादक अरुण ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला

*सन्मान संघर्षाचा*

 यशवंत पवार यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून राज्य राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी न्यायासाठी हक्कासाठी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना या दिवस नसलेल्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी युट्युब पोर्टलला शासकीय मान्यता त्याच बरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या राज्यातील पत्रकारांच्या वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारकडे सतत पाठपुरावा व पत्र व्यवहार करत असल्याने या सर्व बाबींची दैनिक साम्राज्य वृत्तपत्र आणि दखल घेतली असून यशवंत पवार यांना दैनिक साम्राज्याचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे यावेळी बोलताना यशवंत पवार म्हणाले की राज्यातील पत्रकारांसाठी मी करत असलेल्या संघर्षाची दैनिक साम्राज्य वृत्तपत्राने दखल घेऊन मला राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे हा पुरस्कार म्हणजेच मी करत असलेल्या संघर्षाचा पुरस्कार असल्याचे यशवंत पवार यांनी आवर्जून सांगितले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.