पालकांनी सातत्याने प्राध्यापकांशी संवाद साधावा' -सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे


'पालकांनी सातत्याने  प्राध्यापकांशी संवाद साधावा'                                                                                                          -सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे



इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न




पंढरपूर- स्वेरी अभियांत्रिकी मध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. विविध विभागांमार्फत विद्यार्थ्यांच्या हिताचे कार्यक्रम आयोजित करून ते अंमलात आणले जात असताना ‘अतिथी देवो भव’ या उक्तीप्रमाणे स्वेरी परिवाराचे प्रथम अतिथी असलेल्या पालकांना आमंत्रित करून हा ‘पालक मेळावा’ राबवला जात असतो. याचे कारण म्हणजे आपला पाल्य हा स्वेरीच्या सहवासात, प्राध्यापकांच्या  मार्गदर्शनाखाली कसा घडतो? प्राध्यापक व प्राध्यापिका विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी कसे योगदान देतात? या बाबतची माहिती प्रत्येक पालकांना व्हावी. तसेच पालकांनी देखील पाल्यांच्या वर्ग शिक्षकांशी, मेंटॉर टीचर्सशी, पाल्य वसतिगृहात राहत असेल तर हॉस्टेल रेक्टर यांच्याशी नियमितपणे सुसंवाद साधला तर  आपल्या पाल्याच्या जडणघडणीमध्ये नक्कीच फायदा होतो. त्यामुळे पाल्याच्या प्रगतीला दिशा मिळते. यासाठी पालकांनी नेहमी प्राध्याकांशी संवाद साधावा.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी केले.

           


     श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकीच्या इ.एन.टी.सी.अर्थात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने आयोजिलेल्या पालक मेळाव्यात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे हे पालकांना मार्गदर्शन करत होते. पालक प्रतिनिधी म्हणून  गणेश चव्हाण तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून दिपाली चव्हाण हया व्यासपीठावर उपस्थित होत्या. दीप प्रज्वलनानंतर डॉ. व्ही.जी. काळे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाची अद्ययावत माहिती दिली. त्यात उच्चशिक्षित व अनुभव संपन्न प्राध्यापकांमुळे व प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष या कालावधी मध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे सोलापूर विद्यापीठात स्वेरीने उत्कृष्ठ निकालाची परंपरा यंदाही जपल्याचे सांगून इ.एन.टी.सी.विभागासाठी असलेले अभ्यासक्रम, उपयुक्त साधने, अवघड वाटणाऱ्या विषयांचे जादा तास, विविध शैक्षणिक उपक्रम, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा आणि शिका’ योजना, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी संदर्भ पुस्तके, व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त पुस्तके, गेस्ट लेक्चर्स, सी.आय.पी. या व अशा अनेक शैक्षणिक उपक्रमांबाबत त्यांनी आवश्यक माहिती दिली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागासंदर्भात प्रा. ए.ए.मोटे यांनी प्लेसमेंटच्या माध्यमातून कंपन्यांचा चढता आलेख व रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट संबंधी सविस्तर माहिती दिली. यानंतर पालक संजय अडसूळ म्हणाले की, ‘स्वेरीमध्ये ‘नाईट स्टडी’ हा उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक कार्यात एकाग्र होवून अभ्यास करतात. प्राध्यापकांच्या पाठपुराव्यामुळे व सहकार्याने स्वतःचा भविष्यकाळ उज्वल करतात. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्वेरीत नित्य राबवीत असलेल्या ‘पंढरपूर पॅटर्न’ मुळे आमच्या पाल्यांची गुणात्मक प्रगती होत आहे.’ असे प्रतिपादन केले. या पालक मेळाव्यास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस.मठपती, प्रशासन अधिष्ठाता डॉ.एम.बी.कुलकर्णी, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. स्मिता गावडे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. तेजस जोशी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.