स्वेरी फार्मसी व केबीपी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद सत्र संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी आणि पंढरपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करंट ट्रेंड्स इन लाईफ सायन्सेस’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद सत्र कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात नुकतेच संपन्न झाले.
पंढरपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आयक्यूएसी व रुसा अंतर्गत या एक दिवसीय परिसंवाद सत्राचे आयोजन केले होते. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संचालक प्रा.डी.के.गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते तर शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ.मानसिंगराज निंबाळकर, सोलापुरातील वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रा. नामदेव पाटकर आणि कर्जत मधील दादा पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. संदीप पै यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या परिसंवाद सत्रात वनस्पतिशास्त्र विभाग, प्राणीशास्त्र, आणि फार्मसी क्षेत्राची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणे, फार्मसी मधील उत्कृष्टतेसाठी मूल्यावर आधारित फार्मसी शिक्षण देणे आणि भागधारकांमध्ये परस्पर आदर वाढवून संशोधन प्रकल्पांना चालना देणे आदी विषयांवर चर्चा झाली. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीचे प्र.प्राचार्य डॉ.मिथुन मणियार व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जे. साळुंखे, पीजी विद्यार्थी संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक सदस्य, आणि संसाधन संबंधित मान्यवर उपस्थित होते.
या परिसंवादातून शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना एक आंतरविद्याशाखीय मंच प्रदान करणे त्याच बरोबर जीवन विज्ञान आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील सद्य स्थिती आणि अलीकडील घडामोडींवर चर्चा करणे, संशोधक, शिक्षणतज्ञ आणि उद्योग तज्ञांना एका राष्ट्रीय व्यासपीठावर पुढे आणण्यासाठी ज्ञान, अनुभव आणि संशोधन इ. नवकल्पनांची देवाण घेवाण करून मानवी जीवनात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न करणे ही उद्दीष्टे होती. या व्यतिरिक्त, फार्मा आणि लाइफ सायन्स या डोमेनमधील नवनवीन विकास आणि तांत्रिक अनुप्रयोगांचे पुनरावलोकन करण्यासाठी या उपक्रमाने व्यासपीठ दिले. क्लिनिकल आणि औद्योगिक क्षेत्रातील सहयोगी क्षेत्राची भूमिका समजून घेण्यासाठी देखील हे चर्चासत्र उपयुक्त ठरले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. ए.व्ही. लांडगे, डॉ. व्ही.व्ही. मोरे, प्रा.आर.एस.नाईकनवरे, डॉ.एन.एम.पिसे, डॉ. ए.बी. मामलय्या, डॉ. एस. व्ही. थिटे, एस. एन. बागल, एन. पी. पाटील, बी.बी. नाईकनवरे, एस. एस. शिंगटे यांनी नियोजन समितीचे काम पहिले. डॉ. एम. डी. सातपुते व डॉ. मिथुन मणियार यांनी सह-संयोजकाची जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पाडली.
या राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झालेल्या प्राध्यापकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. या परिसंवादा दरम्यान विविध वैज्ञानिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी विविध संकल्पना आणि अनुभव सर्वांसमोर सादर केले. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने या एकदिवसीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. प्रा. स्नेहल चाकोरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. ए. बी. कांबळे यांनी मानले.