ग्रामीण भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट;रांझणीतील विहिरीवरील मोटर,केबल चोरी

 ग्रामीण भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट;रांझणीतील विहिरीवरील मोटर,केबल चोरी



ग्रामीण भागामध्ये सध्या चोरांचा सुळ्सुळाट पाहायला मिळतो. पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील गेल्या महिन्यामध्ये गावातील काही किराणा दुकानात तसेच घरफोडी करून सोने आणि पैशावर मोठा डल्ला मारला होता. त्यानंतर पुन्हा गावात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे.



दिलेल्या माहितीनुसार येथील प्रकाश ढोले यांच्या शेतातील पानबुडी मोटर 600 फूट केबल तसेच मोटर स्टार्टर याची चोरी झालेली आहे. साधारण पंधरा हजार रुपये किमतीची पानबुडी मोटर तसेच पंधरा हजार रुपये किंमतीचे केबल आणि स्टार्टर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत स्थानिक लोकांशी विचारपूस केली असता कोणीही ही घटना न पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र स्थानिकांच्या मदतीशिवाय अशी चोरी होणे शक्य नाही असा संशय व्यक्त होतोय. याबाबत पंढरपूर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदविण्यात आली आहे तरी पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.