सिंहगड,पंढरपूर येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात 'इंट्रोडक्शन टू मॅटलॅब अँड सिमुलेशन'(Introduction to Matlab & Simulation)या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.
पंढरपूर | प्रतिनिधी
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,कोर्टी,पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंट्रोडक्शन टू मॅटलॅब अँड सिमुलेशन(‘Introduction to MATLAB and Simulation’) या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत प्रा.महेश झाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना मॅटलॅब (MATLAB) ची ओळख,मूलभूत संकल्पना,कमांड्स,गणितीय गणना,डेटा हाताळणी तसेच अभियांत्रिकी समस्यांच्या विश्लेषणातील उपयोग याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. त्यानंतर मॉडेलिंग व सिम्युलेशन या संकल्पनांची ओळख करून देत सिम्युलिंक (Simulink) च्या माध्यमातून प्रणालीचे ब्लॉक-आधारित मॉडेल तयार करण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली. मॅटलॅब व सिम्युलिंक (MATLAB व Simulink)हे अभियांत्रिकी प्रणालींच्या मॉडेलिंग, सिम्युलेशन आणि विश्लेषणासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे साधन आहेत.
कार्यशाळेतील विशेष सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मोटरचे सिम्युलिंक (Simulink)मॉडेल तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. विविध ब्लॉक्सचा वापर करून मोटरचे मॉडेल तयार करणे,इनपुट देणे,सिम्युलेशन चालविणे आणि त्यातून मोटरची गती,टॉर्क व कार्यप्रदर्शनाशी संबंधित वैशिष्ट्ये समजून घेण्याची पद्धत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखविण्यात आली.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक संकल्पना, संगणकीय मॉडेलिंग आणि प्रत्यक्ष सिम्युलेशन यांचा परस्परसंबंध समजण्यास मदत झाली. तसेच भविष्यातील प्रयोगशाळा उपक्रम, प्रकल्प व अभियांत्रिकी समस्यांच्या विश्लेषणासाठी मॅटलॅब (MATLAB) आणि सिम्युलिंक
(Simulink) चा उपयोग करण्याची प्राथमिक कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केली.
ही कार्यशाळा यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ.श्याम कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

