पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचा आमदार दत्तात्रय सावंत सरांना जाहीर पाठिंबा

 पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचा आमदार दत्तात्रय सावंत सरांना जाहीर पाठिंबा



शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शैक्षणिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सावंत सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा कला संघटनेचा निर्णय**


**पुणे, दि. ११ ऑक्टोबर २०२६ :** पुणे विभागीय शिक्षक विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत सर यांना पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ, पुणे यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. राज्याचे उपाध्यक्ष किरण सरोदे व जिल्हा संघाचे अध्यक्ष श्री.मिलिंद शेलार यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भातील अधिकृत पाठिंबा पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.


कला शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, त्यांच्या न्याय्य मागण्या, शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी विधान परिषदेत प्रभावीपणे आवाज उठविणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे संघाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.


शिक्षकांच्या सेवाविषयक प्रश्नांपासून ते शैक्षणिक अडचणींपर्यंत विविध विषयांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा आणि त्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणारा प्रतिनिधी विधान परिषदेत असणे गरजेचे आहे. याच भूमिकेतून आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या कार्याचा आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा विचार करून संघाने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.


शिक्षकांच्या व्यापक हिताचा विचार करून, पुणे जिल्ह्यातील कलाशिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळावे संच मान्यतेत बदल करून ५०० एवजी २०० विद्यार्थी संख्या करावी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांचा पाठपुरावा व्हावा, तसेच पवित्र पोर्टलवरून कला शिक्षकांची त्वरीत भरती व्हावी या अपेक्षेने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पाठिंबा पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.


**शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देणारे नेतृत्व अधिक बळकट व्हावे, यासाठी पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाने घेतलेली ही भूमिका शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.**

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.