कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी; लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमच्या वतीने फुलझाडांची भेट

 कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी; लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमच्या वतीने फुलझाडांची भेट



पंढरपूर :

येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष कार्यक्रमाला 'लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम'चे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमच्या वतीने शाळेला एक स्तुत्य भेट देण्यात आली. शाळेच्या प्रांगणात लावण्यासाठी आणि परिसर अधिक सुंदर बनवण्यासाठी क्लबतर्फे विविध प्रकारच्या फुलांची रोपे शाळेला सुपूर्द करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई, लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमचे अध्यक्ष शार्दुल नलबिलवार, तसेच लायन्स क्लबच्या कोळवले मॅडम आणि खिस्ते मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या. या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन कार्यक्रम पार पडला. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. 

तसेच विद्यानिकेतनचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी , रजिस्ट्रार गणेश वाळके उपस्थित होते. सर्वांच्या उत्साही सहभागाने हा जयंती सोहळा अत्यंत आनंदात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.