एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी,पंढरपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक नियमांचे मार्गदर्शन
पंढरपूर :
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने सुरक्षित वाहतूक सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बुधवार, दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी महाविद्यालयाच्या AC Seminar Hall येथे आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग (RTO), सोलापूर यांच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी भाग्यश्री रोडगे, शिवाजी सलगर (उपनिरीक्षक) आणि रोहित भोसले (निरीक्षक) यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, हेल्मेट व सीट बेल्टचा नियमित वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, वेगमर्यादेचे पालन करणे तसेच जबाबदार वाहनचालक म्हणून सुरक्षिततेला प्राधान्य देणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे डॉ. संजय मुजमुले यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसोबत समाजातील इतर नागरिकांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी ओळखून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी, विविध विभागांचे प्रमुख, NSS कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन आणि जबाबदार नागरिक म्हणून वावरण्याबाबत जागरूकता निर्माण झाली.

