कॅम्पस प्लेसमेंटच्या तयारीसाठी पंढरपूर सिंहगडमध्ये १५ दिवसीय पायथॉन डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स प्रशिक्षण*

 *कॅम्पस प्लेसमेंटच्या तयारीसाठी पंढरपूर सिंहगडमध्ये १५ दिवसीय पायथॉन डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स प्रशिक्षण*



पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलच्या वतीने १५ दिवसीय ‘डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स विथ पायथन’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांनी दिली. या प्रशिक्षणाचा सुमारे १०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. प्रशिक्षक वैष्णवी काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


कॅम्पस प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले प्रोग्रामिंग कौशल्य, लॉजिकल थिंकिंग आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. उद्योगक्षेत्रातील तांत्रिक मुलाखती आणि ऑनलाइन कोडिंग टेस्टसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या १५ दिवसीय प्रशिक्षणामध्ये पायथॉन प्रोग्रामिंगची मूलभूत तत्त्वे, व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, ऑपरेटर्स, कंडिशनल स्टेटमेंट्स, लूप्स, फंक्शन्स, स्ट्रिंग्स, लिस्ट, ट्युपल, डिक्शनरी, सेट्स आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग या विषयांचा समावेश होता. तसेच डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स (DSA) अंतर्गत अर्रे, स्ट्रिंग मॅनिप्युलेशन, स्टॅक, क्यू, लिंक्ड लिस्ट, सर्चिंग, सॉर्टिंग, रिकर्शन, टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि समस्या सोडविण्याच्या तंत्रांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.


पायथॉन आणि डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स मधील प्रात्यक्षिक सरावामुळे विद्यार्थ्यांच्या कोडिंग कौशल्यात, तार्किक विचारशक्तीत आणि तांत्रिक आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत झाली. विविध प्रोग्रामिंग समस्या सोडविणे, कार्यक्षम अल्गोरिदम तयार करणे आणि तांत्रिक मुलाखतींमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी करणे यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर, आयटी आणि इतर तांत्रिक क्षेत्रातील कॅम्पस प्लेसमेंट संधींसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळाली.


प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योगाच्या अपेक्षांनुसार कौशल्यविकास करण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी महाविद्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण उपक्रमांमध्ये या प्रशिक्षणाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.