जिल्हा परिषद गटाच्या व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट*

 *जिल्हा परिषद गटाच्या व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट*



*मुंबई / (प्रतिनिधी) -* तालुक्याच्या आणि जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी मिळावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली.


यावेळी चवरे यांनी आपल्या जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा योजना, शाळा खोल्यांची दुरुस्ती, अंगणवाडी इमारती आणि आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली. सध्या मोहोळ तालुक्यावर पडलेल्या दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा झाल्याचे समजते तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.


तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी, पाणंद रस्ते आणि दळणवळणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती चरणराज चवरे यांनी दिली.


या भेटीमुळे जिल्हा परिषद गटातील विकासकामांना गती मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.