सिंहगड पंढरपूर मधील स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बिल्डिंग प्लॅनिंग’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान.
*पंढरपूर :* एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने, सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (सेसा) आणि पीसीआरएफ, पुणे यांच्या सहकार्याने ‘स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी इमारत नियोजनाची मूलतत्त्वे” या विषयावर आमंत्रित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानासाठी अवस्यम डिझाईन स्टुडिओ, पुणे येथील आर्किटेक्ट प्रज्ञा शिवदास यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी द्वितीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना इमारत नियोजनाची मूलतत्त्वे, वास्तुरचना, कार्यक्षम जागा नियोजन, विविध नियोजन तत्त्वे तसेच त्यांचा प्रत्यक्ष व्यावसायिक क्षेत्रातील उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वास्तुशास्त्रीय नियोजन आणि स्थापत्य अभियांत्रिकी यातील परस्परसंबंध विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. गणेश लकडे व प्रा. मिलिंद तोंडसे यांनी काम पाहिले. कार्यक्रमास विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत तज्ज्ञांशी संवाद साधला व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

