कर्मयोगीच्या ‘आविष्कार’मध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नवे व्यासपीठ.* समाजोपयोगी प्रकल्पांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मिळाली चालना

 *कर्मयोगीच्या ‘आविष्कार’मध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नवे व्यासपीठ.*

समाजोपयोगी प्रकल्पांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मिळाली चालना



आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर करून समाजातील सर्वसामान्य घटकांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुखकर करणारे नाविन्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारावेत, असे आवाहन श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘आविष्कार’ प्रकल्प स्पर्धेचे महाविद्यालयीन स्तरावरील आयोजन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथे करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, संशोधन वृत्तीला आणि नवोन्मेषी विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून आपल्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडविले. त्यापैकी १२ प्रकल्पांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी या स्पर्धेचे संयोजक म्हणून काम पाहिले 



या स्पर्धेत हुमानिटी, लँग्वेजेस अँड फाईन आर्ट्स , कॉमर्स, मॅनॅजमेण्ट अँड लॉ, इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजी , मेडिकल & फार्मसी , सायन्स, एग्रीकल्चर अँड ऍनिमल हसबन्ड्री आदी विविध विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. समाजातील प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न विशेष उल्लेखनीय ठरला.


स्पर्धेचे परीक्षण डॉ. अनिल बाबर, प्रा. डॉ. एस. व्ही. एकलारकर, प्रा. दीपक भोसले, डॉ. एस. एम. लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने, प्रा. उदय कार्वेकर, प्रा. जयश्री मदने आणि प्रा. सुषमा चौगुले यांनी केले.


यावेळी कर्मयोगी पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, रजिस्ट्रार जी. डी. वाळके, उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, तसेच विविध विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहसंयोजक प्रा. एस. एम. शिंदे, प्रा. दीप्ती कुलकर्णी, प्रा. अमरजीत देवकर आणि प्रा. के. एस. देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.