सिंहगड महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये ‘टेंडरिंग प्रक्रिये’वर तज्ञ व्याख्यानाचे आयोजन.

 सिंहगड महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये ‘टेंडरिंग प्रक्रिये’वर तज्ञ व्याख्यानाचे आयोजन.



पंढरपूर : कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने स्थापत्य अभियांत्रिकी प्रकल्पांमधील टेंडरिंग प्रक्रिया या विषयावर  शुक्रवार दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी तज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये कोणत्याही बांधकाम प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये निविदा प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. निविदा तयार करणे, निविदा मागविणे, कंत्राटदारांची निवड, तांत्रिक व आर्थिक बाबींचे मूल्यांकन, निविदा कागदपत्रे तसेच कंत्राट व्यवस्थापन याबाबत विद्यार्थ्यांना व्यावहारिक माहिती मिळावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या व्याख्यानासाठी कॅटालिस्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे चे  सीईओ श्री. व्यंकट पाटील हे प्रमुख मार्गदर्शक व्यक्ती म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे निविदा प्रक्रियेतील विविध टप्पे, त्यातील आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक व व्यावसायिक बाबी तसेच अभियंताची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञान न देता उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धतीची ओळख करून देणे, तसेच टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट आणि कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रांमध्ये आवश्यक असलेले व्यावहारिक ज्ञान विकसित करणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यावसायिक जबाबदाऱ्या समजून घेण्यास तसेच बांधकाम क्षेत्रातील विविध संधींची माहिती मिळण्यास मदत होते.

कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी  विभागप्रमुख डॉ. वाय. पी. पवार, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा तज्ज्ञ व्याख्यानांमुळे शैक्षणिक ज्ञान, औद्योगिक अनुभव आणि प्रत्यक्ष प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य यांची सांगड घालण्यास मदत होत असून, विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यावसायिक आव्हाने आणि संधी यांची अधिक चांगली जाणीव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.