सिंहगड पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन विभागात "डेटा कम्युनिकेशनमधील नेटवर्किंग उपकरणे व प्रोटोकॉल" वर कार्यशाळा उत्साहात पार पडली.

 सिंहगड पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन विभागात "डेटा कम्युनिकेशनमधील नेटवर्किंग उपकरणे व प्रोटोकॉल" वर कार्यशाळा उत्साहात पार पडली.



पंढरपूर : प्रतिनिधी


सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे अंतिम वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी “Networking Devices & Protocols for Data Communication” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 


मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी ही कार्यशाळा घेण्यात आली. संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


कार्यशाळेत राउटर, स्विच, नेटवर्किंग उपकरणे, डेटा कम्युनिकेशनमधील विविध प्रोटोकॉल, नेटवर्कची रचना तसेच आधुनिक संगणक नेटवर्कमध्ये या उपकरणांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नेटवर्किंग क्षेत्रातील संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्या.


E&TC शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डेटा कम्युनिकेशन व नेटवर्किंग क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानासोबतच औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक कौशल्यांची ओळख झाली.


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.


 कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. भालचंद्र गोडबोले , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. 

“Learn, Explore, Build a Stronger Network” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या नेटवर्किंगविषयक ज्ञानाला व्यावहारिक व तांत्रिक दृष्टिकोनाची जोड मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.