पंढरपूर सिंहगड मध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना ‘डेटा स्ट्रक्चर अल्गोरिथम : जावा' चे धडे
पंढरपूर : आजच्या तंत्रज्ञानाधारित आणि स्पर्धात्मक रोजगाराच्या युगात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या अपेक्षांनुसार तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डेटा स्ट्रक्चर अल्गोरिथम : जावा' या विषयावर १५ दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुप्रसिद्ध प्रशिक्षक श्री. रक्षित हेगडे यांनी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणादरम्यान सखोल व प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा लाभ १०० हून अधिक अंतिम वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी घेतला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कैलास करांडे यांनी दिली.
कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेसोबतच प्रोग्रामिंग, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिथम, आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल यांना मोठे महत्त्व आहे. विशेषतः इन्फॉर्मेशन व सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्यांच्या ऑनलाइन कोडिंग टेस्ट आणि टेक्निकल इंटरव्ह्यू मध्ये डेटा स्ट्रक्चर अल्गोरिथम वरील प्रश्न विचारले जातात. ही बाब लक्षात घेऊन प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजांशी सुसंगत मार्गदर्शन देण्यात आले.
या १५ दिवसीय प्रशिक्षणामध्ये जावा प्रोग्रामिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग
इत्यादी सारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता विविध कोडिंग प्रॉब्लेम व प्रोग्रामिंग चॅलेन्सेस् प्रत्यक्ष सोडवून घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची
लॉजिकल थिंकिंग, कोडिंग एप्रोच आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता विकसित होण्यास मदत झाली.त्यामुळे विद्यार्थ्यांना आगामी कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेचा आत्मविश्वासाने सामना करण्यासाठी उपयुक्त दिशा मिळाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना चालना मिळून त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. बदलत्या कॉम्प्युटर उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन अशा प्रकारचे उद्योगाभिमुख प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व संबंधित कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

