एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर येथील द्वितीय वर्ष विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची सोलार आर्क इलेक्ट्रिकल्सला औद्योगिक भेट
एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी-पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट एम एस सोलार आर्क इलेक्ट्रिकल्स, भोसे (क) येथे केली याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती, उत्पादन प्रक्रिया, विद्युत उपकरणे, आधुनिक तंत्रज्ञान, देखभाल प्रक्रिया आणि औद्योगिक सुरक्षा याबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उद्योगातील विविध विभागांना भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची माहिती घेतली. तसेच उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद साधून विद्युत अभियांत्रिकीशी संबंधित विविध तांत्रिक बाबी समजून घेतल्या. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणाचा अनुभव घेतला आणि अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानाचा औद्योगिक क्षेत्रातील उपयोग जाणून घेतला.
या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात, व्यावहारिक कौशल्यात आणि औद्योगिक क्षेत्राविषयीच्या समजुतीत भर पडली. विद्यार्थ्यांसाठी ही भेट अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरली.
औद्योगिक भेटीचे आयोजन विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या औद्योगिक भेटीचे यशस्वी आयोजन प्रा. नागनाथ खांडेकर, प्रा. दत्तात्रय कोरके, आणि प्रा. अंजली चांदणे यांनी केले.या औद्योगिक भेटीत द्वितीय वर्ष विद्युत अभियांत्रिकी विभागातील ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

