शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी माढा तालुका काँग्रेसचे आमरण उपोषण शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचविण्यासाठी काँग्रेसचा एल्गार; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा

 शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी माढा तालुका काँग्रेसचे आमरण उपोषण


शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचविण्यासाठी काँग्रेसचा एल्गार; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा



माढा (प्रतिनिधी) | दि. ११ सप्टेंबर


महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे माढा तालुक्यासह राज्याच्या अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होणार असून सदर प्रकल्पाचा ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी आणि, सर्वसामान्य नागरिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी माढा तालुका काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने आज शुक्रवार दि. ११ सप्टेंबर, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता माढा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.


माढा तालुका काँग्रेस राजीव गांधी पंचायती राज संगठनेचे अध्यक्ष संदीप मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या जमिनी बाधित होण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिक व, शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून त्यांच्या भावना आणि आक्षेपांचा शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.


प्रमुख मागण्या:

१. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प तात्काळ रद्द करावा.

२. शेतकऱ्यांच्या जमिनी व हक्कांचे संरक्षण करावे.

३. स्थानिक नागरिकांच्या भावना, हरकती व आक्षेपांचा गांभीर्याने विचार करावा.

४. बाधित शेतकरी व ग्रामस्थांशी योग्य ती चर्चा करूनच कोणताही निर्णय घ्यावा.


“विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त करून विकास होवू शकत नाही” अशी भूमिका माढा तालुका काँग्रेसने घेतली आहे. शेतकरी, ग्रामस्थ आणि, स्थानिक नागरिकांच्या हितासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


शासनाने ह्या आंदोलनाची तातडीने दखल घेवून शक्तिपीठ महामार्गाबाबत फेरविचार करावा आणि, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.