विद्युत अभियांत्रिकी विभागात “ईटॅप (ETAP) – फंडामेंटल टू इंडस्ट्रियल एप्लीकेशन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन*

 *विद्युत अभियांत्रिकी विभागात “ईटॅप (ETAP) – फंडामेंटल टू इंडस्ट्रियल एप्लीकेशन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन*



पंढरपूर - प्रतिनिधी 

विद्युत अभियांत्रिकी विभाग, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर यांनी आय. ई. ई. ई. स्टुडंट ब्रांच (IEEE Student Branch), एस के एन एस सी ओ ई (SKNSCOE) कोर्टी , पंढरपूर, आय ए एस एस के एन एस सी ओ ई एस बी चाप्टर (IAS SKNSCOE SB Chapter) आणि आय ई ई ई महाराष्ट्र सेक्शन (IEEE Maharashtra Section) यांच्या सहकार्याने “ईटॅप (ETAP) – फंडामेंटल टू इंडस्ट्रियल एप्लीकेशन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजल्यापासून विद्युत अभियांत्रिकी विभागात यशस्वी आयोजन केले.


सदर कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ईटॅप (इलेक्ट्रिकल ट्रान्सियन्ट आनालायजर प्रोग्राम) या सॉफ्टवेअरचे मूलभूत ज्ञान तसेच विद्युत शक्ती प्रणालीच्या डिझाईन व विश्लेषणातील त्याचे औद्योगिक उपयोग समजावून देणे हा होता. कार्यशाळेदरम्यान विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सैद्धांतिक संकल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी केली जाते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


या कार्यशाळेचे मार्गदर्शन प्रा. ज्ञानेश्वर क्षीरसागर, असिस्टंट मॅनेजर, महातेक्झ डिझाइन सोल्युशन्स यांनी केले. त्यांना इलेक्ट्रिकल डिझाइन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्षेत्रातील अनुभव असून त्यांनी ईटॅप (ETAP) च्या साहाय्याने विद्युत प्रणालीचे डिझाईन, पॉवर सिस्टम विश्लेषण आणि औद्योगिक प्रकल्पांमधील त्याचे व्यावहारिक उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.


कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ईटॅप (ETAP) आधारित विद्युत प्रणालीचे मॉडेलिंग, पॉवर सिस्टम विश्लेषण आणि औद्योगिक इलेक्ट्रिकल डिझाईन पद्धती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. संवादात्मक स्वरूपाच्या या सत्रामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञान आणि औद्योगिक अनुप्रयोग यातील संबंध समजून घेण्यास तसेच आधुनिक अभियांत्रिकी साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यास मदत झाली.


कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. के. जे. करांडे आणि उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. कोंडूरू शिवशंकर, विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख व आय ई ई ई वरिष्ठ सदस्य (IEEE Senior member)व आय ई ई ई स्टुडंट ब्रँच समुपदेशक (IEEE Student Branch Counselor), यांनी कार्यशाळेच्या नियोजनात व यशस्वी अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


अशा तांत्रिक कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक सॉफ्टवेअर व तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या तांत्रिक क्षमता, व्यावहारिक कौशल्ये आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन अधिक सक्षम होण्यास मदत होते.


या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षकवृंद, आय ई ई ई (IEEE)स्वयंसेवक, विद्यार्थी सहभागी व सहाय्यक कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.