रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पंढरपूर सिंहगडचा दबदबा!* *मेकॅनिकल विभागातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून वार्षिक ₹७.५ लाखांच्या आकर्षक पॅकेजवर निवड*

 
रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पंढरपूर सिंहगडचा दबदबा!

 

मेकॅनिकल विभागातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून वार्षिक ₹७.५ लाखांच्या आकर्षक पॅकेजवर निवड



पंढरपूर : प्रतिनिधी

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने आणखी एक उल्लेखनीय यश आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विभागातील अंतिम वर्षातील पाच गुणवंत विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य आणि जागतिक कीर्तीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली असून, या सर्वांना वार्षिक ₹७.५ लाखांचे आकर्षक वेतन पॅकेज मिळाले आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या उत्कृष्ट प्लेसमेंट परंपरेला आणखी एक सुवर्ण अध्याय लाभला आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ओंकार राजेंद्र मुंढे (बोरगाव, ता. बार्शी), सौरभ संजय दिघे (वाढेगाव, ता. सांगोला), सोहेल बाबू खान (वाठार, ता. कराड, जि. सातारा), वैष्णवी धनंजय पाटील (पिंपळनेर, ता. माढा) आणि श्रेयस सिताराम दामोदरे (पंढरपूर) यांचा समावेश असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी यांनी दिली.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित औद्योगिक समूहांपैकी एक असून फॉर्च्युन ५०० यादीत स्थान मिळवणारी जागतिक दर्जाची कंपनी आहे. ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, ऑइल अँड गॅस, दूरसंचार, वस्त्रोद्योग आणि अत्याधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असून जगभरात तिचा विस्तार आहे. उत्कृष्ट गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि करिअरच्या अमर्याद संधींसाठी ही कंपनी ओळखली जाते.

या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. शाम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

उद्योगजगताच्या अपेक्षांनुसार कौशल्याधिष्ठित शिक्षण, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि प्रभावी प्लेसमेंट उपक्रमांच्या बळावर एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी देशातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध करत असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हा आणखी एक मानाचा ठसा मानला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.